धक्कादायक: एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे पराभूत !

0

जळगाव: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांचा पराभव झाला आहे. भाजपसाठी ही लढत प्रतिष्ठेची होती. याठिकाणी भाजपाने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना तिकीट नाकारले होते. त्यांच्या जागी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची ठरलेल्या या निवडणुकीत अखेर शिवसेनेचे बंडखोर आणि राष्ट्रवादी पुरस्कृत चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देऊन चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती, शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना माघार घ्यायला लावून चंद्रकांत पाटील यांना पुरस्कृत केले होते.

खडसे यांची तिकीट रद्द झाल्याने नाराजी पसरली होती, ही नाराजी अखेर भाजपसाठी महाग ठरली आहे.