धक्कादायक खुलासा; सलमानला उडवायची घेतली होती सुपारी

0

मेरठ : बॉलीवूड कलाकार सलमान खान याला उडवण्याची ३० लाखात सुपारी घेतल्याची कबुली शक्ती नायडू गँगच्या शार्प शूटर रवी भुरा याने केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काऊन्टरमध्ये अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे. तसेच जानेवारी २०१८ मध्ये जोधपूर न्यायालयात हजर झालेल्या सलमानला संपविण्यात येणार होते, असा खुलासा केला आहे.

दरम्यान पोलिस चौकशीमध्ये रवीने मोठमोठे खुलासे केले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या कार्यालयातून रवीने 8 कोटी रुपये लुटले होते. यानंतरचा खुलासा सलमान खानची आणि त्याच्या शेराची झोप उडविणारा आहे. रवीने राजस्थानचा गँगस्टर संपत नेहरासोबत मिळून सलमान खानला कायमचे संपविण्याची सुपारी घेतली होती. हे केवळ तो ३० लाखांत करणार होता. २०१८ मध्ये काळवीट प्रकरणात सलमान खान न्यायालयात हजर राहणार होता. तेव्हा सलमानला मारण्याची धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने दिली होती. आता रवीच्या दाव्यामुळे याचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले.

३० जानेवारीला या गँगचे काही जण मेरठच्या वैष्णो धामचे इन्स्पेक्टर विपीन आणि प्रॉपर्टी डीलरची हत्या करण्यासाठी आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना दिल्लीचे एसीपी ललित मोहन नेगी यांना संपवायचे होते. नेगी यांनी शिव शक्तीवर मोक्का लावला होता. नेगी परतापूरमध्ये एका लग्न समारंभाला आले होते. मात्र, गँगचा एक सदस्य आणि नेगी यांचा पुतण्या असलेल्या तिलकराजने नेगी यांना मारण्यास नकार दर्शविला. यामुळे त्याची हत्या करण्यात आली.