धक्कादायक: पुणे महापौरानंतर उपमहापौरांसह ६ नगरसेवकांना कोरोनाची लागण!

0

पुणे: राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. पुणे शहरातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबातील ८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आता उपमहापौर, विरोधी पक्षनेते यांच्यासह ६ नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर, उपमहापौर यांच्या बैठकीला पुण्यातील दोन खासदार आणि ४ आमदारही उपस्थित होते. त्यामुळे सर्वांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे तर आतापर्यंत महापालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे महापालिकेत इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याने कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.