धनंजय-पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

0

बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे राजकीय वैर संपूर्ण राज्याला ज्ञात आहे. दोघ नात्याने बहिण-भाऊ आहेत. मात्र राजकारणातील ते पक्के वैरी आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर धनंजय आणि पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे प्रथमच एका व्यासपीठावर आले आहे. गहिनीनाथ गडावरच्या एका कार्यक्रमात दोघे एकत्र आले. मात्र या कार्यक्रमात दोघांमध्ये काहीही संवाद झाला नाही. कार्यक्रम सुरु असतानाच पालकमंत्री धनंजय मुंडे यांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक असल्याने ते कार्यक्रमातून निघून गेलेत. दोघांमध्ये याठिकाणी चर्चा होईल असे वाटत होते, मात्र तसे काहीही झाले नाही.