धानोरा विद्यालयातील दोघांची नवोदयसाठी निवड

0

धानोरा – येथील झिपरू तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील ज्युनिअर कॉलेजच्या शैलजा नानू पाटील व अभय सुखदेव साळुंके या दोन विद्यार्थीनींची केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेशासाठी निवड झाली आहे. नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत झि.तो. महाजन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनी घवघवीत यश संपादन करीत विद्यालयातील कु. नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले आहेत.या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे विज्ञान विषयाचे शिक्षक अरूण पाटील यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी. एस. महाजन, विद्यालयाचे चेअरमन सुखदेवराव पाटील, प्राचार्य के. एन. जमादार, शालेय समिती सदस्य चुडामण पाटील, प्रदीप महाजन, वामनराव महाजन, बाजीराव पाटील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.