धावत्या ट्रकमध्ये वीजेचा तार अडकल्याने खांब वाकले!

0

धानोरा- बर्हाणपुर-अंकलेश्वर राज्यमहामार्गालगत असलेल्या पालक नाल्याजवळ  बुधवारी रात्री ३ वाजेच्या दरम्यान धावत्या ट्रकमध्ये वीजेचा तार अडकल्याने दोन खांब वाकले. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. घटनेनंतर वीज कार्यालयाकडून तात्काळ वीजपुरवठा बंद करण्यात आला. घटनास्थळावरुन ट्रकचालक रात्रीच पसार झाला.

दुपारी उशिरा पर्यंत वीज वितरणचे सहाय्यक अभियंता कुणाल तडवी, वायरमन किरण पावरा, विजय ठाकुर, राजेंद्र चव्हाण, शुभम कोळी यांनी वीजपुरवठा सुरळीत केला.