धुळे नगरसेविका पतीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

0 1

धुळे- शहरातील एका नगरसेविकेचा पती प्रवीण महावीर प्रसाद अग्रवाल (रा.भाईजीनगर) विरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपी पसार झाला आहे. 30 वर्षीय पीडीत महिलेच्या तक्रारीनुसार सन 2008 मध्ये महापालिका निवडणुकीत प्रचार करताना आरोपीसोबत ओळख झाल्यानंतर आरोपीने एमआयडीसी परीसरात असलेल्या तलावाजवळील झुडूपांमध्ये नेऊन अत्याचार केला तसेच अश्लील फोटो काढले. हे फोटो इतरांना दाखविण्याची तसेच पीडित महिलेच्या वडिलांना मारण्याची धमकी देत आरोपीने महामार्गावरील कुणाल हॉटेल, शिर्डी, सप्तशृंगी गडावरील रुममध्ये सतत नेऊन अत्याचार केल्याचा आरोप पीडीतेन केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.