बनावट दारूचा कारखाना उध्वस्त

0 1

दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
धुळे: शहरातील भीमनगर येथे स्पिरीट पासून तयार करण्यात येणाऱ्या बनावट दारूचा कारखाना धुळे पोलिसांनी उध्वस्त केला असून दारूसाठी लागणारे स्पिरीट तसेच साधने मिळून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भीमनगर भागात स्पिरीट पासून बनावट दारू बनवली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक एम रामकुमार अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षण दिलीप गांगुर्डे यांनी आपल्या कर्मचार्यांसह दि १८ रोजी याठिकाणी धाड टाकून स्पिरीट तसेच दारू बनवण्यासाठीचे साहित्य मिळून १,६९३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान याप्रकरणी संशयित आरोपी धनराज जितेंद्र शिरसाठ,सोन्या नागराज पवार,किरण धिवरे,विनायक अर्जुन इंगळे,फरार असून यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.