धुळ्यासह जळगावामधील प्रथितयश डॉक्टरांच्या रुग्णालयांवर आयकर विभागाच्या धाडी

0 1

शासकीय योजनांमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय ; पथकाकडून माहिती देण्यास नकार

धुळे/जळगाव- जळगावसह धुळ्यातील प्रथितयश डॉक्टरांच्या रुग्णालयांसह घरांवर औरंगाबाद आयकर विभागाच्या पथकाने बुधवारी धाडी टाकल्याने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मोठ्या रुग्णालयांमध्ये शासकीय योजनांमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय असून त्याबाबत अधिकार्‍यांकडून कसून कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे समजते.

धुळ्यात सकाळपासून तपासणीने खळबळ
धुळे शहरातील दोन नामांकित डॉक्टरांच्या घरी व रूग्णालयावर औरंगाबाद आयकर विभागाचे अधिकार चार खाजगी वाहनातून दाखल झाले असून मालेगाव रोडसह साक्री रोडवरील प्रथितयश डॉक्टरांकडे सुरू असलेल्या तपासणीने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. काही महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती लागल्याची माहिती असून या कागदपत्रांची कसून तपासणी सुरू आहे. या दोन्ही डॉक्टरांनी शासकीय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करून स्वत:चा फायदा केल्याची चर्चादेखील आहे. या दोन्ही डॉक्टरांच्या रूग्णालयाच्या बाहेर वाहनांचा ताफा उभा होता. शहरातील दोन नामांकित डॉक्टरांच्या घरी व रुग्णालयावर आयकर विभागाची धाड पडल्याचे समजताच अनेकांनी या रुग्णालयाकडे धाव घेतल. दरम्यान, आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी नेमकी काय कारवाई केली याची माहिती मिळू शकली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.