नंदुरबारातील अण्णासाहेब पाटील महामंडळाचा समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

0

तीन हजारांची लाच भोवली : नंदुरबार एसीबीच्या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ

नंदुरबार : अण्णाभाऊ पाटील महामंडळ कौशल्य विकास विभागातून शासकीय योजनेंतर्गत थकीत व्याजाची रक्कम ऑनलाईन खात्यावर जमा करण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणार्‍या या विभागाचा जिल्हा समन्वयक योगेश निंबा चौधरी (शहादा) यास नंदुरबार एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

लाच भोवली अन आरोपी जाळ्यात
नंदुरबार जिल्ह्यातील 40 वर्षीय तक्रारदाराने अण्णाभाऊ पाटील महामंडळ कौशल्य विकास विभागातून शासकीय योजनेंतर्गत महिंद्रा पीकअप वाहन खरेदी केले असून या योजनेंतर्गत कर्जाचे व्याज शासन भरत असल्याने ते तक्रारदाराच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यासाठी आरोपी जिल्हा समन्वयक योगेश निंबा चौधरी (शहादा) याने 3 रोजी तीन हजारांची लाच मागितली होती तर तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने त्यांनी नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर त्यास सापळा रचून अटक करण्यात आली. ही कारवाई नंदुरबार एसीबीचे पोलिस उअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे, पोलिस निरीक्षक जयपाल अहिरराव, महाजन, गुमाणे, चित्ते, मराठे, नावाडेकर, अहिरे, बोरसे, ज्योतो पाटील आदींच्या पथकाने केली.