नंदुरबार एलसीबीतर्फे गरजू कुटुंबांना अन्न धान्याचे वाटप

0

नवापूर। येथील नंदुरबार एलसीबीतर्फे गरजू कुटुंबांना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमुळे अनेक परिवारांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. दोन वेळ भोजनाची अवस्था बिकट झाली आहे. आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये, यासाठी नंदुरबार जिल्हाचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.का. महेंद्र नगराळे, शांतीलाल पाटील, दादाभाई वाघ,जितेंद्र तोरवणे यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली.

पुर्ण जगभरात कोरोना विषानुचा कहर सुरु आहे. देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन असुन या दिवसात गरीबांचे मोठे हाल होत आहे. हे सर्व चिञ पाहता नंदुरबार एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखी पोलीस कर्मचाऱ्यांनी मास्क व जिवनावश्यक वस्तूंची किट तयार करुन ४ दिवस पुरेल असे ४६ गरजू कुंटुबांना वाटप करण्यात आले.

कृर्षी उत्पन्न बाजार समिती मागील वसाहत, देवफळी,धनलक्ष्मी कॉलनीतील मागील वसाहत, रंगावली किनाऱ्याजवळील वसाहत,अशा अनेक भागात रोज काम करणारे यांना जीवनावश्यक वस्तुची किट देण्यात आली. लाँकडाऊन काळात गरिबांची उपासमार होऊ नये यासाठी पोलीसांनी या काळात राबविलेला उपक्रम खाकी वर्दीतील माणुस दाखवुन दिला.पोलिसांच्या या कार्याचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.