नंदुरबार जिल्ह्यात कृषी औजार दुकाने खुली करण्यास परवानगी

0

नंदुरबार -‍ केंद्र सरकारच्या आदेशानुसार कृषी औजारे, त्याचे सुटे भाग विक्री व दुरुस्ती करणारी दुकाने खुले ठेवण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे.
लॉकडाऊनच्या काळात दुकाने सुरू करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे परवानगी अर्ज करण्यात यावे. तालुका कृषी अधिकारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दुकाने खुले ठेवण्याची परवानगी देतील. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांना परवाना प्राधिकृत अधिकारी म्हणून आदेशित करण्यात आले आहे.
दुकाने सुरू ठेवताना सामाजिक क्रियाकलाप (सोशल डिस्टन्सिंग) बाबतच्या तसेच कोविड-19 बाबत देण्यात आलेल्या इतर सुचनांचे पालन करावे. निर्धारीत मापदंडाचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित दुकान मालकाची राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.