नंदुरबार जि.प. वर सेना-कॉंग्रेसची सत्ता; कारभार ‘यंगस्टर’च्या हाती !

0

नंदुरबार: दोन दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर नंदुरबार जिल्हा परिषदेवर अखेर सेना- कॉंग्रेस आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी काँग्रेसच्या सीमा पद्माकर वळवी यांची तर उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे राम रघुवंशी यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या सदस्यांनी काँग्रेसच्या उमेदवार सीमा वळवी यांना समर्थन दिले. तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदान घेण्याची मागणी केली. त्यानुसार एकूण 56 पैकी काँग्रेस उमेदवार सीमा वळवी यांना 56 मते पडली, तर शिवसेनेचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार राम रघुवंशी यांना 30 मते पडली आहेत.

अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या रूपाने नंदुरबारला तरुण नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कारभार ‘यंगस्टर’च्या हाती आला आहे.