नंदुरबार पोलिसांकडून दोन इराणी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना अटक !

0

नंदुरबार: दहा वर्षापासून भारतात वास्तव्यास असलेल्या इराणच्या दोन आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना नंदुरबार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मध्य प्रदेशात ही कारवाई केली आहे. अली जमील महबूउबी, सईद इमाईल फेरेइदोनपौर असे दोन्ही आरोपींचे नाव आहे.

इराणी टोळीतील या गुन्हेगारांनी महाराष्ट्रासह देशातील विविध शहरांमध्ये तसेच खेडे गावांमध्ये भारतीय चलनातील नोटा तपासण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडवले आहे. त्यानंतर पोलीस यंत्रणा या गुन्हेगारांच्या शोधात होती. अखेर नंदुरबार पोलिसांनी या गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून या कारवाईवरून नंदुरबार पोलिसांचे देशभरातून कौतुक होत आहे.