नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी दिलीप थोरे यांची नियुक्ती

0

नंदुरबार – जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून दिलीप थोरे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून प्राथमिक शिक्षण विभागाचा पदभार डॉ.राहुल चौधरी यांच्याकडे होता. नंदुरबार जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला कायमस्वरूपी प्राथमिक शिक्षणाधिकारी मिळण्याची वाणवा होती त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाचे गाडे उपशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी हे हाकत होते. आता प्राथमिक शिक्षण विभागाला दिलीप पंढरीनाथ थोरे यांच्या रूपाने नवीन शिक्षणाधिकारी मिळाले आहेत. थोरे यांची पदोन्नतीने नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव रवींद्र पाटील यांनी या संबंधीचे नियुक्ती आदेश काढले आहेत. दरम्यान, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी हे देखील बदलीस पात्र असल्याने त्यांचीही बदली होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत होता, ती प्रतीक्षा आता पूर्ण झाली आहे.