नंदुरबार शहरात स्फोट सदृश्य आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !

0

नंदुरबार: शहरात आज शुक्रवार दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला. या आवाजाची तीव्रता खूप होती, त्यामुळे शहरातील नागरिक भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक घराबाहेर पडू लागले आहे. कसला आवाज होता? याबाबत काहीही स्पष्टता झालेली नाही. घरे हलल्याचे बोलले जात असून नागरिकांनी भीतीने घर सोडण्याला सुरुवात केली आहे. घरातील वस्तूंची पडझड झाली असून खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.