Sunday , March 18 2018

नक्षल्यांकडून घात, 9 जवान शहीद

सुकमात सीआरपीएफचे भूसुरुंगविरोधी वाहन उडविले
सहा जवान गंभीर, सीआरपीएफ कमांडोंकडून शोधमोहीम सुरु

रायपूर : सुकामा जिल्ह्यातील किस्तराम येथे केंद्रीय पोलिस राखीव दलाच्या जवानांचे गस्तीवर असलेले भूसुरुंगविरोधी वाहन दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी बारुदाच्या सहाय्याने उडविल्याने नऊ सीआरपीएफ जवान शहीद झाले असून, सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत, पैकी तीन जवानांची प्रकृती चिंताजनक होती. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी बेछूट गोळीबारही केला होता. त्यामुळे शहीद जवानांची संख्या वाढली. घटनास्थळी तातडीने अतिरिक्त कुमक व सीआरपीएफचे कमांडो पाठविण्यात आले होते, परंतु नक्षलवादी जंगलात पळून गेले. त्यांची जोरदार शोधमोहीम राबविण्यात आली होती. या घटनेचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी निषेध व्यक्त केला असून, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात देश सहभागी आहे, अशी सहानुभूती व्यक्त केली आहे. सीआरपीएफच्या 212 बटालियनचे जवान या भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवित होते. यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या सुमारे 100 नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले.

सीआरपीएफ कमांडोंकडून कोम्बिंग ऑपरेशन
लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सुरुवातील बारुदाच्या सहाय्याने भूसुरुंगविरोधी वाहन उडवून दिले, आणि त्यानंतर काही कळायच्याआतच गोळीबार सुरु केला. त्यात नऊ जवान शहीद झाले तर सहा जवान गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच, तातडीने घटनास्थळी अतिरिक्त मदत पोहोचली. शहीद व जखमी जवानांना अत्यंत सतर्कतेने जंगलाबाहेर काढण्यात आले, तसेच कमांडो पथकाने जंगलात कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले होते. रात्री उशिरापर्यंत चकमक सुरु होती. जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. होळीच्या दिवशी सीआरपीएफच्या जवानांनी तेलंगणा-छत्तीसगड सीमेवर संयुक्त मोहीम राबवित 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यात सहा महिला नक्षलवादीदेखील मारण्यात आल्या होत्या. त्या घटनेनंतर सीआरपीएफ जवानांचा सूड उगविण्याची संधी नक्षलवादी शोधत होते. दुर्देवाने ती संधी मंगळवारी त्यांना मिळाली असल्याचे सांगण्यात आले.

हे देखील वाचा

पुढील निवडणुका मतपत्रिकेद्वारे?

मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यास भाजपाची तयारी सर्व पक्षांची संमती आवश्यक राम माधव यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *