नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर यांची बदली

0

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका नगररचना आणि विकास विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर यांची बृहन्मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपसंचालकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी मंत्रालयातील नगरविकास विभागाचे सहाय्यक संचालक राजेंद्र पवार यांची वर्णी लागली आहे. पवार यांनी आज (सोमवारी) पदभार देखील स्वीकारला आहे.

उपसंचालक प्रकाश ठाकूर यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत तीन वर्ष पूर्ण झाले होते. नगररचना विभागाने 8 मार्च रोजी प्रकाश ठाकूर यांची बृहन्मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपसंचालकपदी बदली केली. त्यांच्या जागी पिंपरी महापालिकेत मंत्रालयातील नगरविकास विभागाचे सहाय्यक संचालक राजेंद्र पवार यांची नियुक्ती केली. पवार यांनी पदभार देखील स्वीकारला आहे.

दरम्यान, उपसंचालक प्रकाश ठाकूर यांची 14 फेब्रुवारी 2018 रोजी बृहन्मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपसंचालकपदी बदली झाली होती. त्यांच्या जागी झोपडपट्टी निमुर्लन आणि पुनर्वसन (एसआरए) विभागाचे उपसंचालक अ.ग.गिरकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, ठाकूर यांनी पिंपरी पालिकेतील पदभार सोडला नव्हता. त्यांनी मुदत वाढवून आणली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागाच्या उपसंचालकपदाच्या नियुक्तीमध्ये एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे.