नगरसेवक अय्युब बलेसरिया यांच्यातर्फे २०० हुन अधिक गरजूंना किराणा मालाचे वाटप

0

नवापूर: नगरपालिकेचे नगरसेवक अय्युब बलेसरिया यांनी लॉकडाऊनच्या काळात गरजू गरिब कुटुंबाना आठवडाभर पुरेल एवढे किराणा मालाचे किट वाटप करुन मदतीचा हात दिला आहे. विशेष म्हणजे कोणते ही फ़ोटो न काढता त्यांनी अत्यंत गरजु लोकांना मदत केली आहे. माणुसकी भाव टिकला पाहीजे, काम केले म्हणून प्रसिद्ध व्हा, प्रसिद्धीसाठी काम करु नका, गरिबांना त्यांची मजबुरी पाहुन मदत करणे व फोटो काढणे मला योग्य वाटत नसल्याचे दान याला म्हणत नाही, असे त्यांनी सांगितले. गरजु लोकांची या लाँकडाऊनच्या काळात उपासमार होऊ नये, म्हणुन मदतीचा हात देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला आहे.