नगरसेविका रेणुका गावीत, विनय गावीत प्रभागातील लोकांच्या संपर्कात

0

८० गरजु लोकांना किराणाचे किट वाटप

नवापूर। कोरोनामुळे सर्वाधिक फटका गरिबांना बसत असुन लाँकडाऊन काळात काम नसल्याने त्यांची उपासमार होऊ नये म्हणुन त्यांना मदतीचा ओघ सुरु आहे. अशावेळी नवापूर शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील अत्यंत गरीब व ज्यांना खूप गरज आहे. अशा खाकरफळी भागातील गरजू परिवारांना स्थानिक नगरसेविका रेणूका विनय गावित, माजी नगरसेवक विनय गावित यांनी स्व.खर्चाने ८० गरजु लोकांना किराणा सामानाचे किट वाटप केले.
निस्वार्थ सेवा या भावनाने या उभयतांनी केलेल्या कार्याचे स्थानिक जनतेने आभार मानले आहे. ज्यांनी आपल्याला निवडुन दिले आहे. त्या प्रभागातील लोकांच्या संपर्कात राहुन विनय गावीत व रेणुका गावीत यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे.