नरडाणा एम.आय.डी.सी.मध्ये वंडर सिमेंट करणार 450 कोटीची गुंतवणुक

0

दोंडाईचा : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नरडाणा एम.आय.डी.सी.मध्ये राजस्थान मधील उदयपूर येथील आर.के.ग्रुपच्या वंडर सिमेंट कंपनी 450 कोटीची गुतवणुक करणार आहे. 20 लाख टन क्षमतेच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू करण्‍याची ग्वाही राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना वंडर सिमेंटचे संचालक श्री.पी.पाटीदार यांनी दिली. या कंपनीत 1 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आज ना.जयकुमार रावल यांच्या मंत्रालयीन दालनात याबाबत वंडर सिमेंटचे संचालक पी.पाटीदार व श्री. नविन सिंग यांच्याशी चर्चा झाली, यावेळी जिल्हा परीषदेचे सदस्य कामराज निकम, नरेंद्रकुमार गिरासे आदी उपस्थित होते.

उदयपूर येथील आर.के.ग्रुपच्या वंडर सिमेंट या कंपनीने नरडाणा एम.आय.डी.सी. मध्ये जातोडे गावाजवळ हा उदयोग उभारण्याचे ठरविले असून याठिकाणी पहिल्या टप्प्यात 20 लाख टन क्षमतेचा उदयोग उभा राहणार असून दुस-या टप्प्यात 40 लाख टनाचा दुसरा टप्पा देखील उभारण्याचे ठरविले आहे, या उदयोगासाठी नरडाणा रेल्वे स्टेशनवरून रेल्वे सायडींग देखील करण्यात येणार असून या उदयोगामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार तर उपलब्ध होणार असून ट्रक व्यावसायीक व इतर अवलंबीत लोकांना देखील मोठा लाभ होणार आहे. राज्याचे पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी याठिकाणी उदयोग उभारावा म्हणून आर.के.ग्रुपला आग्रह केला होता.