नराधम बापाचा सख्ख्या लेकीवर सलग 4 वर्ष बलात्कार

0

जळगाव;- येथील एमआयडीसी परिसरात नराधाम बापाने आपल्या सख्या मुलीवर गेल्या चार वर्ष बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी स्वतः पीडित 17 वर्षीय मुलीने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठत छळ असह्य झाल्याने नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी कि महावितरण कंपनीचा कर्मचार्‍याने तिच्या मुलीवर 2016 ते 2019 पर्यंत अशी एकूण चार वर्षे घरी कुणी नसताना जीवे मारण्याची धमकी देवून वेळोवेळी मुलीवर बलात्कार केला. मुलीने एकदा आईलाही प्रकार कथन केला मात्र तिलाही विश्‍वास न बसल्याने उलट मुलीलाच वेड्यात काढले. आई पोलिसात तक्रार देवू देणार नाही म्हणून मुलीने शनिवारी स्वतः एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठले व आपबिती सांगितली. पुढील तपास पीएसआय संदीप पाटील करीत आहे.