नवकार महामंत्राचा जप करून भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा

0

अक्कलकुवा। येथे जैन बांधवाकडून घरोघरी द्वीप प्रज्वलित करून व नवकार महामंत्राचा जप करून भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा केला. देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या देशात लोकड़ाऊंन असल्याने शहरातील जैन समाज बांधवानी भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव आपआपल्या घरी राहून घरात रात्री ७:३० वाजता द्वीप प्रज्वलित करून, नवकार महामंत्राचा जाप, तसेच शंख व थाली वाजून साजरा केला.

शहरातील श्री वासुपूज्य स्वामी जैन मंदिर व जिनकुशलसुरि दादावाडी येथे प्रशासनाने दिलेल्या सुचनाचा पालन करून मंदिरात गर्दी न करता पूजऱ्यांनी सकाळी विधिवध पूजा अर्चना करून आरती केली. सकल जैन समाजाने एकमताने निर्णय घेऊन घरा बाहेर न पडता आपल्या घरीच राहून तप, आराधना, जप, व रात्री ७:३०वाजता आपल्या घरात द्वीप प्रज्वलित करून, शंख व थाली वाजवावी तसेच नवकार महामंत्रचा जप करून कोरोना महामारी जगातून नाहीशी व्हावी, यासाठी भगवान महावीरांना प्रार्थना केली.

भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव निमित्ताने अखिल भारतीय खरतरगच्छ युवा परिषदतर्फे गरजू लोकांना अल्पोहार वाटप करण्यात आले. तसेच समता युवा संघतर्फे घरी राहून व्हाट्सअपच्या माध्यमाने धार्मिक कविता व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच समाजातील काही लोकांकडून गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले. त्याचसोबत लोकड़ाउन सुरु झाल्यापासून अनेक गरजू लोकांना जेवनाचे वाटप समाजातील काही लोकांकडून सोय केली जात आहे. तसेच लोकडाउन सुरु झाल्यापासून अनेक गरजू लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत या परिस्थितित एकही व्यक्ति उपाशी राहु नये ह्या मुख्य उद्देशाने अखिल भारतीय खरतरगच्छ युवा परिषदतर्फे फुड़ पेकेटचे वितरण मागील दहा दिवसापासून गरजू लोकांना दिले जात आहे.