Monday , July 23 2018

नवाजुद्दीनला वाचवण्यासाठी रिजवानचा बळी

ठाणे । ठाणे पोलिसांनी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या भावाला वाचवण्यासाठी वकील रिजवान सिद्दीकीला बळीचा बकरा बनवल्याचा आरोप सिद्दीकी यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी केला. ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीही या दोघांना वाचवण्यासाठी खाटाटोप करत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीचा वकील रिजवान सिद्दीकी याला अटक करण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली होती. न्यायालयात रिजवान सिद्दीकी याचे वकील रिजवान मर्चंट म्हणाले की, पोलिसांनी केलेली अटक ही बेकायदेशीर आहे. नवाजुद्दीनच्या पत्नीचा सीडीआर पेशाने वकील असलेला रिजवान सिद्दीकी कशाला काढेल. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुठल्याही प्रकारे नोटीस न देताच रिजवानला केलेली अटक बेकायदेशीर आहे. नवाजुद्दीन आणि त्याच्या भावाला वाचवण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी वकील रिजवान सिद्दीकीला बळीचा बकरा बनवल्याचा आरोप सिद्धिकी यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी केला. बेकायदेशीर सीडीआर प्रकरणात अटक आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याची पत्नी आणि वकील रिजवान सिद्दिकी यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. अखेर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री मुंबईच्या वर्सोवा येथून वकील रिजवान सिद्दीकी याला अटक केली. सीडीआर प्रकरणातील हा 12 वा आरोपी असून त्यापैकी रजनी पंडित यांना जमीन मिळालेला आहे.

सीडीआर कशासाठी मागवले होते याचा खुलासा होणार
सिनेअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या पत्नीचे कॉल रेकॉर्ड वकील रिजवान सिद्दीकी यांनी मागवले होते. ही बाब पोलीस कोठडीतील आरोपींच्या चौकशीत समोर आली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने जबाब नोंदवण्यासाठी नावाजुद्दीन सिद्दीकी आणि त्यांची पत्नी व त्यांचे वकील रिजवान सिद्दीकी यांना समन्स पाठविले. मात्र त्याला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनी वकील रिजवान सिद्दीकी यांना शुक्रवारी अटक केली. त्यांना न्यायलयात नेले असता 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. नवाजुद्दीन यांच्या पत्नीचे सीडीआर सिद्दीकी यांनी कशासाठी मागवले होते याचा खुलासा होणार आहे. रिजवान सिद्दीकी यांनी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसाठी वकील म्हणून काम केलेले आहे. रिजवान सिद्दीकीला ठाणे गुन्हे शाखेने न्यायालयात आणले. सिद्दीकी यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी न्यायालयात युक्तिवाद करीत पोलिसांनी 41(अ)ची नोटीस न देता अटक केली असून रिजवान सिद्दीकी निर्दोष असल्याचे सांगितले.

नवाजुद्दीन आणि त्याच्या भावाला वाचवणारा अधिकारी कोण?
नवाजुद्दीन सिद्दीकी हा वकील रिजवान सिद्दीकीचा क्लाईंट आहे. रिजवान यांनी केवळ डिटेक्टिव्ह याची ओळख करून दिली. त्यांनी सीडीआर काढला. त्याच्याशी रिजवान सिद्दीकीचा संबंध काय? ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी हा नवाजुद्दीन आणि त्याच्या भावाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तो अधिकारी कोण? याबाबत मला काहीशी माहिती आहे. ठोस पुरावे घेऊन त्या अधिकार्‍यांशी संवाद साधणार असून बेकायदेशीर अटकेला आम्ही आव्हान देणार असल्याचे मर्चंट यांनी सांगितले. दरम्यान न्यायालयाने 23 मार्चपर्यंत दिलेली पोलीस कोठडी ही चुकीची असल्याची प्रतिक्रिया वकील मर्चंट यांनी व्यक्त केली. दुसरीकडे पोलिसांनी लावलेले कलम बेलेबल ऑफेन्स आहे. म्हणून कलम 420 चा जाणीवपूर्वक प्रयोग करण्यात आला आहे. फसवल्याची कुणाची तक्रार पोलिसांकडे आहे काय? असा सवाल करत मर्चंट यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.

हे देखील वाचा

भिवंडी परिसरातील अनधिकृत गोदामासंदर्भात तातडीने कार्यवाही 

डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिले आदेश  नागपूर  : भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात उभारलेल्या अनधिकृत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!