नवापुरात दुसर्‍या दिवशीही वातावरण तापले

0

अत्याचार करून अत्महत्याप्रकरण; तिघा आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

नवापूर । मोबाईलमध्ये अल्पवयीन युवतीचे आक्षेपार्ह छायाचित्रण करून तीच्यावर दबाव टाकून तीघा युवकांनी शारिरीक व मानसिक छळ केल्याची गंभीर व संतप्त घटना येथे घडली. दरम्यान सदर युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याने नवापूर पोलीसांत गुन्हा दाखल झाला असून तिघे आरोपींना अटक करण्यात आली आहे. या बाबत येथील चर्मकार समाजाने शाळकरी मुलींच्या हस्ते प्रशासनाला निषेधार्थ निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर शहरात या प्रकरणी वातावरण ढवळुन निघाले आहे. निवेदनाचा पाऊस पडत असुन व मोर्चा निघु लागला आहे. पोलीसांना आरोपींना त्वरीत अटक केली आहे.

तिनही आरोपी पोलीसांच्या ताब्यात
येथील देवळफळी भागात राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन युवतीने 21 जुलै रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आधी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान अधिक तपासाअंती मयत युवतीस आत्महत्येला प्रवृत्त केले गेले. या अनुषंगाने पोलीसांनी मुलीच्या आईची फिर्याद दाखल करीत महेश पवार, जावेद मुनाम शेख व आरीफ शेख यांच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण व सुरक्षा अधिनियम कलम 12, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये काल 26 रोजी गुन्हा दाखल करून आरोपींना तत्काळ अटक केली. दरम्यान मुलीने आत्महत्या करण्याआधी आरोपींनी संगनमत करून युवतीचे आक्षेपार्ह फोटो व छायाचित्रण मोबाईलमध्ये करून तीला फसवणूक करीत शारीरिक व मानसिक रित्या त्रास दिला. हा त्रास असह्य झाला व समाजात बदनामी होईल ह्या भितीने युवतीने आत्महत्या केली होती.

विविध पक्ष एकवटले
हिंदु चर्मकार समाजाच्या मुलीचे लैगिक शोषण करुन आत्महत्येस प्रवृत करुन मरणास कारणीभूत झाले. याबाबत आरोपीनां कडक शासन व्हावे, याबाबत आज राष्ट्रीय स्वयमसेवक संघ, देवफळी परीसरातील नागरीक, शिवेसना, मनसे, युवा सेना, भारतीय जनता पार्टी, विश्‍व हिंदु परिषद, राजे गृप, मृत्यृंजय गृप अशा आठ विविध संघटना, विविध पक्षातर्फे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना निवेदन देण्यात आले सकाळी 11 वाजे पासुन ते संध्याकाळी 5 वाजे पर्यंत निवेदन येत होते. ज्यावेळी देवळफळी परीसरातील महिल्यांनी पोलिस स्टेशन येथे निवेदन दिले त्यावेळी महिल्यांनी प्रचंड प्रमाणात आक्रोश केला आरोपीना कठोर शिक्षा दया साहेब नाही तर स्ञीयांचे घराबाहेर निघणे धोक्याचे होईल.आमचा छकुलीला न्याय दया.त्या नराधमांना फाशी द्या साहेब अशी मागणी करत होते.

पिंढीत विद्यार्थीनीला शासनांचा नियमा प्रमाणे जी काही मदत मिळायची असते.त्या संबधीत विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच तीन आरोपीना 3 ऑगष्टपर्यंत पी.सी देण्यात आली आहे. नवापूर शहरातील नागरीकांनी शांतता ठेऊन पोलिसांना सहकार्य केले आहे.
-विजयसिंग राजपूत, पोलीस निरिक्षक, नवापूर