नवापूर येथे भाजपाचा वर्धापन दिन गरजूंना मदतीचा हात देऊन साजरा

0

भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली लाँकडाऊन काळात गरजुना जेवणाची व्यवस्था

नवापूर। शहरात नवापूरचे भाजपा नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भरत माणिकराव गावित यांच्या उपस्थित सोशल डिस्टन्सिंग पाळून साध्या पध्दतीने भाजपाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पाश्वभुमीवर साध्या पध्दतीने वर्धापन दिन साजरा करुन गरिबांना मदतीचा हात देण्यात आला.

सर्वप्रथम कार्यालयावर भरत गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत गाऊन भारतमातेच्या घोषणा देऊन पंडित दिनदयाल, डॉ.शामा प्रसाद यांना अभिवादन केले. यानंतर भरत गावित यांच्या हस्ते शहरातील तिनटेंभा ,धडधड्या, फुलफळी, खाखरफली, रेल्वे स्टेशन,प्रभाकर कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या वस्तीत अशा सर्व भागातील १५०० लोकांना दुपारचे भोजन मसाला(खिचडी) घरोघरी जाऊन वाटप करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजु गावित,जिल्हा उपाध्यक्ष अनिल वसावे, जिल्हा चिटणीस एजाज शेख, नगरसेवक महेंद्र दुसाने, विजय सैन,तालुका सरचिटणीस दिनेश चौधरी, जितेंद्र अहिरे, जाकीर पठाण, जयंती अग्रवाल, भावीन राणा , स्वप्नील मिस्त्री, शहर सरचिटणीस हेमंत जाधव , अनिल दुसाने, अजय गावित, समीर दलाल, सौरभ सोनार, शाहरुख खाटीक, रणजित गावित , मानिष प्रजापत उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जनता पार्टी शहर पार्टीने परिश्रम घेत वर्धापन दिन साजरा केला.