नव्या मिळकतींवरील कर वाढणार

0

पुणे : महापालिकेकडून 2019-20 पासून नव्याने मिळकतकर लावल्या जाणार्‍या बांधकामांना स्टँडर्ड डिडक्शन (देखभाल-दुरूस्ती वजावट) आता 10 टक्केच मिळणार आहे. त्यामुळे नव्याने आकारणी होणार्‍या मिळकतींचा कर महागणार आहे.

महापालिकेकडून 1970 पासून हा कर आकारताना मिळकतधारकास ही 15 टक्के सवलत दिली जात होती. त्यावर 2011 मध्ये राज्यशासनाने आक्षेप घेत पालिकेस वारंवार कळविले होते. त्यानंतर अखेर आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यास मुख्यसभेत मान्यताही देण्यात आली आहे.