नांद्रे-काकडणे व शिरसगाव-तळोंदे दरम्यान धावणार बस

0

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मागणीला यश

चाळीसगाव- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर व कार्यकर्ते यांच्यावतीने चाळीसगांव आगार प्रमुख यांना नांद्रे-काकडणे व शिरसगाव-तळोंदे येथील शालेय विध्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन 14 रोजी महाराष्ट्र राज्य परिीवहन महामंडळ जळगांव विभाग येथून आलेले एस.ए.सातपुते वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण) जळगाव तसेच चाळीसगांव आगार प्रमुख संदीप निकम यांनी बस सेवा सुरू करण्यासंदर्भात नांद्रे-काकडणे येथील रस्त्यांची पाहणी करून विद्यार्थी मित्रांसाठी वरीष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून बससेवा लवकरच सुरू करू अशी लेखी आश्वासन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी यांना दिले असल्याने परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. आगार व्यवस्थापक यांनी निवेदनाची दखल घेत दोन्ही गावांना बसेस उपलब्ध करून दिल्याने तालुकाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्यकर्त्यानी आभार मानले आहेत.