नाईट लाईफ वरून आदित्य ठाकरे यांचा विरोधकांना टोला

0

मुंबई: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाइट लाईफ साठी परवानगी दिली आहे, त्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. यावरून आदित्य यांनी महाराष्ट्रातील जनतेचे मन साफ असून, मुंबईतील दुकाने रात्री उघडी राहिल्यास त्याचा फायदा होणार असल्याचा खुलासा केला आहे. तसेच नाइट लाईफ विषयी बोलतांना पुढे त्यांनी ‘मन दुषित असेल तर दृष्टीकोनही तसाच असतो’ असाही टोला त्यांनी लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पर्यावरण जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. आदित्य ठाकरे यांची ही संकल्पना आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते. मी माझ्या वाढदिवसाला किमान एक झाड लावेन आणि त्याचे संगोपन करेन अशी शपथ यावेळी विद्यार्थ्यांसहित सर्वांनीच घेतली.

भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे हवा गुणवत्तेच्या बाबतीत धोक्याच्या पातळीत आली असून महाराष्ट्रातील २० शहरांचा यात समावेश आहे. मुंबई हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून गणले गेले आहे. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांकापेक्षा तीनपटीने खालावला आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत आहे. ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने दरवर्षी एक पर्यावरणीय अहवाल सादर केला जातो. या वर्षीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.