नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन कायम

0

पिंपरी ः नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) या कायद्याच्या विरोधात पिंपरी-चिंचवड संविधान बचाव समितीच्या वतीने शुक्रवार (दि. 17) पासून धरणे आंदोलन सुरु आहे. धरणे आंदोलनाचा बुधवारी पाचवा दिवस आहे. तरी, आंदोलनाची तिव्रता कायम आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात धरणे आंदोलन सुरु आहे. यामध्ये मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हिंदु मुस्लीम भाई, एनआरसी, सीएए बाय, बाय, ‘सीएए’, ‘एनआरसी’, ‘एनपीआर’ रद्द करा, भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र है, हमको चाहिय आजादी अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात येत आहेत. नागरिकांमध्ये या कायद्याविषयी नाराजी आहे. नागरिकांना आपले भारतीयत्व सिद्ध करावे लागणार आहे. सरकारने हे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.