नागरिकांसाठी चौका चौकात उभारले हॅण्डवॉश पॉईंट

0

जामनेर – आ. गिरिष महाजन, नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून जामनेर नगर पालिकेच्या वतीने शहरातील आराफात चौक, राजमाता जिजाऊ चौक, भुसावळ रोड , वाकिरोड कॉर्नर या ठिकाणी हॅन्डवॉश पॉईट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी दोन टाक्या ठेवण्यात आल्या असून, एका टाकी मध्ये सर्फ पावडरचे पाणी व एका टाकीत साधे पाणी ठेवण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या लोकांसाठी तसेच कामा निमित्त शहरात आलेल्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत जामनेर न.पा.चे मुख्याधिकारी राहूल पाटील यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी पालीकेचे आरोग्यसभापती कैलास नरवाडे, मुख्याधिकारी राहुल पाटील सहायक मुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, रमेश हिरे,दत्तु जोहरे,रवींद्र महाजन, जिवन कलाल,अनील माळी आदी उपस्थित होते.