नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात भुसावळ विभागात धरणे आंदोलन

0

तहसील प्रशासनाला निवेदन : आंदोलनात मुस्लीम महिलांचा लक्षणीय सहभाग

भुसावळ : नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात भुसावळसह बोदवड व रावेर, यावल व फैजपूरात शुक्रवारी मुस्लीम समाजातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सी.ए.ए. व एन.आर.सी. व एन.पी.ए.कायदा रद्द करण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

भुसावळातील धरणे आंदोलनात महिलांचा सक्रिय सहभाग
भुसावळ-
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संविधान बचाव समितीतर्फे आयोजीत धरणे आंदोलनात मुस्लीम समाजातील महिलांचा सक्रिय सहभाग राहिला. केंद्र सरकारकडून लागू करण्यात येत असलेला काळा कायदा म्हणजेच सीएए व एनआरसी हा महाराष्ट्र राज्यात लागू होऊ दिला जाणार नाही, असे राज्य सरकारतर्फेही सांगण्यात आले असल्याने आपण या कायद्याला घाबरू नये, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले. प्रास्ताविक एमआयएमचे फिरोज शेख यांनी केले. माजी आमदार नीळकंठ फालक, संजय ब्राम्हणे, डॉ.सुवर्णा गाडेकर, सादीका जमील अहमद, मुजाहिद अय्युबखान, मौलाना हकीम, जगन सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. साबीर शेख, विनोद सोनवणे, मौलाना मुक्ती जावेद आदींसह मुस्लीम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान बचाव समितीतर्फे तहसीलदार दीपक धीवरे यांना राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस मंगला पाटील, शहराध्यक्षा नंदा निकम, डॉ.सुवर्णा गाडेकर, सायराबानो मुन्वर खान आदींनी निवेदन दिले.

यावलमध्ये सीएए व एनआरसीविरोधात धरणे आंदोलन
यावल-
शहरातील तहसील कार्यालयाबाहेर शुक्रवारी संविधान बचाव समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वधर्मीय बांधवांसह महिलांचा मोठा सहभाग राहिला. शुक्रवारी दुपारी दोन वाजेपासुन सातोद रस्त्यावर असलेल्या नवीन तहसील कार्यालयासमोरील शशीकांत सखाराम चौधरी कन्या शाळेच्या समोरील प्रांगणात आंदोलक यायला सुरवात झाली. तीन वाजता आंदोलन सुरू करण्यात आले. यात सीएए, एनपीआर व एन.सी.आर कायदा रद्द करण्याची मागणी करीत घोषणा देण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी फरहा नाज, अ‍ॅड.नितीन रजाने, राष्ट्रवादीचे विजय पाटील, सैय्यद आसमा, हाजी शब्बीर खान, प्रदीप सपकाळे, सोहेल आमीन, मौलाना गुलाम अहेमद रजा, मो.हाजी याकुब शेख सह मान्यवरांनी येथे आंदोलकांना संबोधीत केले. यात सोहेल आमीन म्हणाले की, या देशात स्वातंत्र्यासाठी मुस्लिमांनी देखील बलिदान दिले असून आज त्यांच्याकडे पुरावे मागुन त्यांच्यावर हा एका प्रकारे अन्याय केला जात आहे. पाच आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ तहसील कार्यालयात गेले व तिथे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना सदरील कायदे रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात हाजी शब्बीर खान, हाजी ताहेर शेख चाँद, शेख हकीम शेख अलाउद्दीन, जिल्हा परीषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, प्रमोद पारधे, अनिल जंजाळे, पंकज तायडे, नगरसेवक मनोहर सोनवणे, गौतम अडकमोल, अताउल्ला खान, शेख आलीम शेख रफीक, शेख हकीम हाजी शेख याकूब, पंकज तायडे, शेख असलम शेख नबी, गौतम अडकमोल, शेख सईद शेख रशीद, बबलु तायडे, इकबाल खान रशीद खान, मो.शफी रफीयोद्यीन, शेख मजहर, इकबाल खान, मोहसीन खान गफुर खान, अजहर शेख सह संविधान बचाव समितीचे मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रसंगी उपस्थिती होती.

फैजपूरात संविधान बचाव कृती समितीतर्फे धरणे आंदोलन
फैजपुर-
संविधान बचाव, देश बचाव, सीएए, एनपीआर, एनआरसी रद्द करण्यासाठी शुक्रवारी फैजपूर येथे संविधान बचाव कृती समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत फैजपूर येथील कै.लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी क्रीडा संकुलात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी हाजी अब्दुल रऊफ जनाब, अशोक भालेराव, डॉ.अब्दुल जलील, भीम आर्मी प्रदेश प्रवक्ता रमाकांत तायडे (जोजो), अ‍ॅड. खालीद शेख, मौलाना ताहेर पटेल, हाफिज इकबाल, हाफिज अनस, हाफिज वसीम, असगर सैय्यद, शेख सादिक शेख हसन, कालु मिस्तरी, अजमत शेख मुनाफ, चंद्रकला इंगळे, रेखा मेढे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान यावेळी संविधान जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, भारत जिंदाबाद या घोषणांनी तब्बल दोन तास धरणे आंदोलन स्थळ दणाणून सोडण्या आले. यावल तहसीलचे नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांनी निवेदने स्वीकारले. या धरणे आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, भीम आर्मी सेनेतर्फे भीम आर्मी प्रदेश प्रवक्ता रमाकांत तायडे (जोजो) यांनी पाठींबा दिला. यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक शेख जफर, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता शेख कुर्बान, उपनगराध्यक्ष रशीद तडवी,शेख जलील हाजी अब्दुल सत्तार,शेख इरफान, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रीयाज, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अन्वर खाटीक, युवक काँग्रेस शहराध्यक्ष वसीम जनाब, आसीफ मॅकनिकल, शेख रईस मोमीन, शाबाजखान, याकूबखान, हाजी फिरोज शेख इब्राहिम, सलीम खान उस्मान खान, मुदस्सर नजर, डॉ.इमरान शेख, शेख कामिल, सईद मिस्तरी यांच्यासह संविधान बचाव कृती समितीने परीश्रम घेतले. सूत्रसंचालन मलक आबीद यांनी केले.

बोदवडला नायब तहसीलदारांना निवेदन
बोदवड –
तहसील कार्यालयासमोर शुक्रवार, 17 रोजी सी.ए.ए. तसेच एन.पी.ए.कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दीपक कुसकर यांच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, पी.आर.पी.नेते जगन सोनवणे, मौलवी आमीन, मौलवी इस्तयाक, युनूस परवे, मुनाफ ठेकेदार, हाजी सईद बागवान, सलामोद्दीन, इरफान शेख, हसन ठेकेदार, साजीद परवे, साबीर पटवे, बशीर कंडक्टर, इजहार शेख, हाफीज फिरोज, अरमान कुरेशी, मोलवी, गुलाम हैदर, तस्लीम मण्यार, संगीता भामरे, ईश्वर जंगले, दीपक झांबड, धनराज जैस्वाल, नगरसेवक देवेंद्र खेवलकर, विनोद पाडर, डॉ.उध्दव पाटील, डॉ.सुधीर पाटील, विनोद मायकर, आनंदा पाटील, विजय पालवे यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

रावेरातही धरणे आंदोलन
रावेर-
तहसील कार्यलयाजवळ मुस्लिम समाजातर्फे एसीसी व एनआरसी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाजवळ मुस्लिम समाजातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. एसीसी व एनआरसी कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी शेख गयास, यूसुफ खान, आसीफ मेंबर, सादीक नबी, असद खान, रफीक अजीज, शेख कालू शेख नूरा, सैय्यद आशिफ, फिरोज खान, शेख इरफान, असगर खान, समद अजीज यांच्यासह हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.