नाणारचे समर्थक करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई होणार: संजय राऊत

0

मुंबई: युती सरकारच्या काळात कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. परंतु सुरुवातीपासूनच शिवसेनेने याला विरोध केला आहे. सत्तेत असताना शिवसेनेने याला विरोध केल्याने युती सरकारमध्ये प्रचंड मतभेद दिसून आले. अखेर भाजपने नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली होती. दरम्यान आता महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पुन्हा नाणारचा विषय चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प सुरु करणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र काही शिवसैनिकांनी नाणारला समर्थन दर्शविले आहे. नाणारचे समर्थक शिवसैनिक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असे बोलले जात आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाणारचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

नाणारचे समर्थक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. आजच सकाळी मुख्यमंत्री यांनी नाणारवरून शिवसेनेची भूमिका कायम असून नाणार प्रकल्प होऊ देणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर काही शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहे.