नातू, नात यांनी मोबाईलवरच घेतले आजोबांचे अंतिम दर्शन

0

शिंदखेडा। कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने बडोदा येथे राहत असलेल्या नात व नातूला आजोबांचे अंत्यदर्शन मोबाईलवरच घेण्याची वेळ आली.

शिंदखेडा येथील पंचायत समितीचे सेवानिवृत्त कर्मचारी छगन दामोदर बोरसे (वय ८१) यांचे ८ रोजी सकाळी ९ वा.वृद्धपकाळाने शिंदखेडा येथे राहत्या घरी निधन झाले. कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे निवडक लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वा.अंत्यसंस्कार करण्यात आले. सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळुन अंत्यसंस्कार करण्यात आले. ते शिंदखेडा येथील दिनेश हेअर आर्टचे मालक रविंद्र बोरसे तर कन्नड येथील जिल्हा परिषद शिक्षक किरण बोरसे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, २मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

निधन झालेल्या छगन बोरसे यांचा नातू निलेश बोरसे व नात बडोदा येथे राहतात. त्यांचा मृत्यूची बातमी शिंदखेडा येथून त्यांना देण्यात आली. मात्र लॉकडाऊनमुळे येण्याचे सर्वच मार्ग बंद असल्याने आजोबांच्या अंत्यविधीला येता आले नाही. अखेर नातू, नात व नातजावाई यांनी मोबाईलवरच अंत्यदर्शन घेतले. अखेरच्या क्षणी आपली माणसं आपल्यापासून कोरोनामुळे दुरावली आहेत हेच म्हणावे लागेल.