नायगावातील बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

0 1

यावल : तालुक्यातील नायगाव येथील सलीम सिराज तडवी या बारावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने सोमवारी रात्री 10 वाजेनंतर गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी सिराज तडवी यांच्या खबरीनुसार यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सलीमचे काही मुलांंसोबत भांडण झाल्यानंतर त्यास खूप वाईट वाटले व त्याने आत्महत्या केली, असे खबरीत नमूद करण्यात आले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.