नाशिकच्या अपघातात २६ ठार; मोदींनी व्यक्त केले दु:ख !

0

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात काल मंगळवारी झालेल्या बस आणि रिक्षा अपघातातील मृतांचा आकडा आता २६ पर्यंत पोहोचला आहे. या घटनेवरून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींना देखील सरकार मदत देणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवरून तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पीएमओ इंडिया या आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले असून जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना देखील केली आहे.