नाशिकजवळ बस – कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

0

नाशिक : चांदवड येथील रेणुकामाता मंदिराजवळ टायर फुटल्याने कार बसवर जाऊन आदळली. या झालेल्या अपघातात वणी येथील एकाच कुटूंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. वणी येथील सप्तशृंगी पतसंस्थेचे संचालक संजय समदडीया, पत्नी वंदना समदडीया व मुलगा हिमांशु समदडीया अशी मृतांची नावे आहेत.

धुळे येथे नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यास समदडीया कुटुंब गेले होते. विवाहसोहळा आटोपून वणी येथे परतत असताना हा अपघात झाला. फोर्ड फिगो या कारमधुन ते परतीचा प्रवास करत होते. एस टी बस व कारच्या अपघातात बळी गेलेल्या समदडीया कुटुंबियांच्या नातेवाईकांना जबर धक्का बसला असून वणी शहरातुन शेकडो नातेवाईक घटनास्थळी पोहचले. या घटनेमुळे वणी शहरावर शोककळा पसरली आहे. संजय समदडीया यांच्या समवेत प्रवास करणारा दुसरा मुलगा जखमी असुन चांदवडच्या रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.