नाशिकमध्ये भीषण अपघात; ११ जण ठार !

0

नाशिक: नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. यात बस आणि रिक्षा शेजारील शेतातील विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील काही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवणला जात होती. बस आणि रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

मेशी फाट्याजवळ हा अपघात झाला. बस आणि रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. यावेळी आधी रिक्षा आणि नंतर बस कोसळली. यामुळे रिक्षामधील सात ते आठ प्रवासी जागीच ठार झाले. तर बसमधील तीन प्रवासी ठार असून हा आकडा वाढण्याची भीती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.