निगडीत रंगणार पाळीव कुत्र्यांचे डॉगथॉन स्पर्धा

0

अफगाणिस्थानात आढळणारा अफगाण हाउंड डॉग, सैबेरियातील सैबेरियन हास्की, थंड प्रदेशातील न्यू फाउंड लॅण्ड, सेंट बर्नाडर तर उंदराइतक्या छोटय़ा आकाराचा चुंवा हुवा डॉग अशा अत्यंत वैविध्यपूर्ण प्रजातीचे श्वान पाहण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना उपलब्ध होणार आहे. ‘रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने ३१ मार्च रोजी निगडीमध्ये डॉगथॉन स्पर्धा रंगणार आहे..

ही स्पर्धा निगडी प्राधिकरण येथील सेक्टर 26 मधील छत्रपती शिवाजी महाराज स्विमिंग पूल, हेडगेवार भवन येथे सकाळी सात ते दहा या वेळेत होणार आहे. या स्पर्धेसाठी डॉग एन्ट्री फी रुपये 150 आणि प्रेक्षकांसाठी रुपये 50 अशी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेतील बेस्ट ड्रेसे मेल आणि फिमेल डॉग, बेस्ट कपल, बेस्ट ग्रुम्ड डॉग, संस्कारित डॉग असणा-या श्वानांना योग्य ती पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील खास आकर्षण म्हणजे चालणे, आकर्षक वेशभूषा, डॉगसाठी विविध स्पर्धा, सेल्फी बुथ हे असणार आहे.

या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या श्वान मालकांनी बहार 9552598749, आदिती 9960931956 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.