निर्भया हत्याकांड: पवन गुप्ताची याचिका फेटाळली

0

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. पावन गुप्ताने आपल्या अर्जात अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वसंमतीनं पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका आज फेटाळून लावलीय. ही क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टानं फेटाळली तरीदेखील दोषी पवन जवळ दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

याचि क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. पवननं आपल्या अर्जात घटनेवेळी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. यापूर्वी त्याची न्यायमूर्ती एन व्ही रमन्ना, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरीमन, न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी हा निर्णय एकमतानं दिलाय. दोषी पवनच्या याचिकेवर सकाळी १०.२५ मिनिटांनी सुनावणी सुरू झाली होती. क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी बंद दाराआड केली जाते. त्यानुसार ही सुनावणी पार पडली.

निर्भयाच्या चारही दोषींना फासावर लटकावण्यासाठी ३ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आलीय. कायदेतज्ज्ञ नवीन शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, आज न्यायालयानं पवनची क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळली गेली तरी त्याच्याकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्याला ही दया याचिकाही ३ मार्चपूर्वी अर्थात आजच दाखल करावी लागेल. कायद्यानुसार, दया याचिका दाखल केलेल्या कोणत्याही दोषीला ती फेटाळण्यात येईपर्यंत फासावर चढवता येत नाही. दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर १४ दिवसांनंतर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकते.