निर्भायातील दोषींना अल्पसा दिलासा; कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत फाशी टळली

1

नवी दिल्ली: दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरले होते. या बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची फाशीच्या शिक्षा दिली जाणार आहे. उद्या १ फेब्रुवारीलाच दोषींना फाशी दिली जाणार होती. त्यासाठी कोर्टाने दुसऱ्यांदा डेथ वॉरंट जारी केला होता. मात्र, निर्भयाच्या दोषींना उद्या होणारी फाशीची शिक्षा टळली आहे. पटियाला हाऊस कोर्टाने पुढील आदेश होईपर्यंत डेथ वॉरंटला स्थगिती दिली आहे. दरम्यान निर्भायाच्या आईने दोषींच्या वकिलाने कोर्टात आव्हान दिले असले तरी आम्ही लढत राहू असे सांगितले आहे.

दोषींकडे सध्या कायदेशीर उपाय उपलब्ध आहेत. दिल्ली जेल नियमांनुसार फाशी एकत्रच दिली जाते. अशा परिस्थितीत मृत्यूदंडाची वॉरंट अनिश्चित काळासाठी थांबविला पाहिजे. त्याचबरोबर मुकेशच्या वकील वृंदा ग्रोव्हर यांच्या कोर्टातील उपस्थितीवर निर्भयाच्या वकील सीमा कुशवाह आणि सरकारी वकील यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, जेव्हा मुकेशवर सर्व कायदेशीर पर्याय संपले असताना या प्रकरणात आता त्याच्या वकिलाचा कोर्टात या केसशी काहीही संबंध नाही असे सुनावणीदरम्यान दोषींच्या वकिलाने सांगितले आहे.