निवडणुका एकत्र घेण्याबाबत राज्य सरकार केंद्राला अहवाल देणार

0 2
अर्थमंत्री सुधीर मुंगनटीवार यांच्यासह दोन सदस्यीय समिती
मुंबई: लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत वारे जोरदार वाहू लागले आहे. महाराष्ट्र राज्य सरकार यासाठी आग्रही असून राज्य सरकार 4 महिन्यात केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे. देशांत विविध निवडणुकांमुळे सुमारे 315 दिवस आचारसंहितेमध्ये जातात. याचा परिणाम राज्याच्या कामावर, प्रशासनावर, विकासावर होतो. म्हणूनच निवडणुका एकत्र घेण्याबाबत राज्य सरकार केंद्राला येत्या चार महिन्यात अहवाल देणार आहे. निवडणुका एकत्र घेण्याबाबत प्रत्येक राज्याला अहवाल देण्याबाबतच्या सूचना केंद्राने केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुंगनटीवार यांचा समावेश असलेली दोन सदस्यीय समिती सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी आणि विविध संस्था यांच्याशी चर्चा करून अहवाल केंद्राला पाठवणार आहे.
कोणत्या राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी नाही, तर दीर्घकालीन विचार करुनच हा अहवाल तयार करत असल्याचे समितीचे प्रमुख सुधीर मुनगंटीवर यांनी स्पष्ट  केले. जास्तीत जास्त राज्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसोबतच विधानसभेची निवडणूक घेण्यासाठी शासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत.  एका इंग्रजी दैनिकाने काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभा निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी लोकसभा निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्येही होऊ शकते, असे वृत्त काही दिवसांपूर्वीच दिले होते.