नीरव मोदीच्या पेंटिंग्जचा ५७ कोटीत लिलाव

0

मुबई: पीएनबी बँकेला कोट्यावधीचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीच्या पेंटिंग्जचा आयकर विभागाने ५४.८४ कोटींचा लिलाव केला आहे. नीरव मोदीने आयकर विभागाचे ९७ कोटी रुपये थकविले होते. त्यामुळे आयकर विभागाने त्याच्या पेंटिंग्जचा लिलाव करून ५९.३७ कोटी रुपये मिळविले. त्यासाठी एका खासगी कंपनीची मदत घेण्यात आली होती. या पेंटिंग्जचा लिलाव केल्यानंतर कंपनीचे कमिशन देऊन आयकर विभागाच्या खात्यात ५४.८४ कोटी रुपये जमा झाले आहेत.

राजा रवी वर्मा, व्ही. एस. गायतोंडे, एफ. एन. सूजा, जगन चौधरी आणि अकबर पद्मसी आदी महान चित्रकारांच्या पेंटिंग्ज मोदीच्या संग्रहात होत्या. त्यापैकी गायतोंडे यांची पेंटिंग्ज २५.४ कोटीला विकण्यात आली. विशेष म्हणजे २०१५ मध्ये गायतोंडेंच्या याच पेंटिंग्जला २९.३ कोटींची बोली लावण्यात आली होती. देशातील ही सर्वात महागडी पेंटिंग्ज असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या लिलावाला मोदीच्या केमलॉट इंटरप्रायजेसने आक्षेप घेतला असून हा लिलाव बेकायदेशीर असल्याची नोटीस आयकर विभागाला पाठवली आहे.