नीरव मोदीला कोर्टाकडून धक्का; मालमत्तांचा लिलाव रोखण्यास मनाई

0

मुंबई – पीएनबी बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार असलेल्या नीरव मोदीच्या पेंटिंग्जचा लिलाव करण्यात आला आहे. जवळपास ५५ कोटीमध्ये हा लिलाव झाला आहे. दरम्यान हा लिलाव रोखण्यात यावा यासाठी कंपनीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली असून हायकोर्टात आलेल्या नीरव मोदीच्या कंपनीच्या तूर्तास दिलासा नाही. त्यामुळे लिलाव सुरूच राहणार आहे. १ एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीत आयकर विभागाला याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. ६८ पैकी केवळ १९ पेंटिग्ज नीरव मोदीच्या मालकीच्या असल्याचा कंपनीचा दावा आहे. नीरव मोदीच्या मालकीच्या तब्बल 68 महागड्या पेंटिंग्जच्या लिलावाला स्थगिती देण्याची मागणी करत नीरव मोदीच्या कॅमेलॉट एंटरप्रायझेस या कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

https://bit.ly/2CEI34n

कॅमेलॉट एंटरप्रायझेसच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत लिलावाला परवानगी देण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. सॅफ्रन ऑर्ट या कंपनीमार्फत या पेंटिग्जचा ऑनलाइन लिलाव करण्यात येणार आहे. मात्र, एकूण 68 पेंटिग्जपैकी केवळ 19 पेटिंग्ज या नीरव मोदीच्या मालकीच्या आहेत. अन्य पेंटिग्जची मालकी अन्य कंपनींकडे आहेत, असा दावा या याचिकेमध्ये केला आहे.

आयकर विभागाकडे मोदीची सुमारे 95 कोटी रुपयांची थकबाकी असून या वसुलीसाठी पेंटिग्जचा लिलाव करण्याची परवानगी मुंबईतील पीएमएलए कोर्टानं दिली आहे. सध्या या पेंटिग्जचा ताबा अमंलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) आहे. चित्रकार राजा रविवर्मा, व्ही एस गायतोंडे, एम.एफ. हुसैन, अकबर पदमसी आदी प्रख्यात कलाकारांच्या या पेंटिग्ज असून त्याची किंमत कोटीच्या घरात असण्याची शक्‍यता आहे. तसेच मोदीच्या 11 आलिशान गाड्यांचा लिलाव करण्याची परवानगीही विशेष न्यायलयाने दिली आहे.