नुपूर महोत्सवात भुसावळकरांनी अनुभवला त्रिवेणी नृत्य संगम

0

कटक ओडीसाचे पद्मश्री डी.प्रकाश राव यांनी केले महोत्सवाचे उद्घाटन ; संभाषणातून उलगडला जीवनप्रवास ; सहभागी कलावंतांनी दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश ; कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाहिली शहिदांना आदरांजली

भुसावळ- शहरातील नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त नुपूर महोत्सव 2019 नुकतेच आयोजन करण्यात आले. कटक ओडीसाचे पद्मश्री डी.प्रकाश राव यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. कृष्णचंद्र सभागृहात सायंकाळी झालेल्या कार्यक्रमास अध्यक्ष आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भारत विकास परिषदेच्या अध्यक्षा निलीमा नेहेते उपस्थित यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला शहीद जवानांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कलाकारांनी जिंकली रसिकांची मने
रमाकांत भालेराव यांनी प्रास्तविक करतांना नुपूर अ‍ॅकेडमीच्या कार्याचा आढावा घेत यंदाची दहा हजार रुपयांची शिश्यवृत्ती जाहीर केली. रंगभूषा करणार्‍या सीमा चिव्हाणे तर वेशभूषा करणार्‍या कलावंतांना सन्मानीत करण्यात आले. सुरुवातीला हिमांशु जावळे, रोहिणी महाजन, लोचन जावळे यांनी चौताल सादर केला. त्यांना तबल्यावर शिरीष जोशी तर संवादिनीवर स्मिता कुळकर्णी यांनी नीसाथसंगत केली.तर पढंत चारु भालेराव यांनी केले. यानंतर दत्त स्तुती-राग- मांड, लावण्या पाटील, चंद्रजा इंगळे, हेमांगी पंडागरे, आदिती शर्मा, मान्या गुप्ता, दक्षा चौधरी, तराना – त्रिताल-राग जोग, नियती राणे, मानसी राणे, कल्याणी सपकाळे, वैष्णवी कुंभार,धनश्री चौधरी, श्रावणी जोशी, प्रगती सिंग, शिव शंकरा ( शिव स्तुती) – ताल केरवा राग विभास, आश्लेषा सपकाळे, शलोनो मिसाळ, नुपूर भालेराव, अवनी धाडसे, रिद्धीमा चौधरी, तृप्ती गुप्ता, विधी ऐदलाबादकर, अंशु प्रेरणा, गौरी राणे, अवनी खेडुलकर, रुत्वी भिरूड, दीया गंधेले, कुचिपुडी व भरतनाट्यम संयुक्त नृत्य –
हरिष बहादूर व जॉर्ज जॉन छत्तीसगढ यांनी कौतुकम व किर्तनम सादर करुन रसिकांची मने जिंकली.

विविध नृत्यांचे सादरीकरण
प्रसंगी नृत्य नाटिका (सेव्ह ट्रीज)- पूनम गायकवाड, हर्षा गायकवाड, नीलम धाडसे, श्वेता ताकसांडे, मानसी राणे, धनश्री चौधरी, डिंपल गाढे, कल्याणी सपकाळे, दक्षा पवार, श्रावणी जोशी, प्राची महाजन, प्रियदर्शनी तायडे, रोहिणी महाजन, लोचन जावळे, नुपूर भालेराव, कुचिपुडी नृत्य- हाीष बहादूर छत्तीसगढ, शिव स्तुती – ताल त्रिताल राग विभास, चारू भालेराव, अनुष्का फलटनकर, हर्षदा कोल्हे, शिवशंभो- शिव वंदना- ताल केरवा राग कल्याण, नियती राणे, तनुश्री रोकडे,वैष्णवी कुंभार, वेदिका सपकाळे, उर्वशी कोळी, भरतनाट्यम- जॉर्ज जॉन, छत्तीसगढ यांनी सादरीकरण केले. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे – कार्यक्रमात सहभागी सर्व कलावंत सहभागी होउन वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. सर्व सहभागी कलावंतांना पदक प्रदान करण्यात आली सूत्रसंचालन भावसार यांनी केले. यशस्वीतेसाठी शंभू गोडबोले, संदीप जोशी, अजिंक्य नाईक, शुभम कुळकर्णी ,प्रांजल कुळकर्णी, अनिकेत सोनवणे, हिमांशु जावळे, मदन चिव्हाणे, सपकाळे, दीपक फालक, साहिल फालक, रोहिणी महाजन आदींनी परीश्रम घेतले.