Tuesday , June 19 2018
Breaking News

नुबेरशाह शेखने विजेतेपद राखले

मुंबई । शिवाजी पार्क जिमखान्यावर विजेतेपदाची उत्कंठता शिगेला पोहोचली असताना नुबेरशाह शेख, राकेश कुलकर्णी, ओम खरोला आणि वेदांत पानेसर यांच्यात कडवी चुरस रंगली होती. अखेर नुबेरशाहने ओम खरोलाविरुद्ध बरोबरी पत्करली आणि राकेश कुलकर्णीने वेदांत पानेसरला बरोबरीत रोखले. मात्र, नवव्या फेरीआधी घेतलेली अर्ध्या गुणाची आघाडी नुबेरशाह शेखसाठी फायद्याची ठरली. या आघाडीच्या जोरावरच नुबेरशाहने आठ गुणांसह सतीश सबनीस जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. नुबेरशाहचे हे सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धेचे सलग दुसरे जेतेपद ठरले. ग्रँडमास्टर नॉर्म पटकावणार्‍या नुबेरशाहला 21 हजार रुपये रोख आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.

भारताचा आंतरराष्ट्रीय हॉकीपटू युवराज वाल्मीकी आणि भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण अमरे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. सरस गुणांच्या आधारे राकेश कुलकर्णीने 7.5 गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली, त्याला 15 हजार रुपयांवर समाधान मानावे लागले.
ओम खरोलाने 7.5 गुणांसह तिसरा तर साईराज चित्तलने चौथा क्रमांक प्राप्त केला. त्यांना अनुक्रमे 11 हजार आणि 9 हजार रुपये रोख तसेच आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.सशक्तांच्या स्पर्धांमध्ये दिव्यांग खेळाडूंना संधी, ही अभावानेच पाहायला मिळते. पण सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धेत अंध बुद्धिबळपटूंसाठी वेगळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेलाही अंध बुद्धिबळपटूंनी तुफान प्रतिसाद दिला.

हे देखील वाचा

सुपर इगल्स ठरले क्रोएशियासमोर निष्प्रभ

सेंट पिटर्सबर्ग । फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेतील शनिवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात क्रोएशियाने आपल्या पहिल्याच लढतीत सुपर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!