नोकरीच्या आमिषाने 6 लाखांत गंडविणार्‍या डॉक्टरसह तिघांना अटक

0 2

आर्थिक गुन्हे शाखेने लावला छडा

वरणगा न.पा.च्या बनावट लेटरहेड, शिक्क्याचा वापर

जळगाव- भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील दोन जणांना वरणगाव नगरपालिकेत लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखून चार जणांनी 6 लाखांत गंडा घातला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत दाखल गुन्ह्यात पोलिसांनी फसवणूक करणार्‍या तीन जणांना 14 रोजी अटक केली आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता, 20 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्या आली आहे. संशयितांमध्ये रुईखेडा येथील डॉक्टराचाही समावेश आहे.
भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील हेमंत मिलिंद पाटील यांच्यासह एका जणाला वरणगाव नगरपरिषद येथे लिपीक पदावर नोकरी लावून देण्यात आमिष दाखविले. यानंतर या कामासाठी संशयितांनी प्रत्येकाकडून 1 लाख 50 हजार रुपये असे एकूण 6 लाख रुपये घेतले होते. याप्रकरणी 26 जानेवारी रोजी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल होता.

नोकरीवर रुजू होण्याचेही आदेशही दिले होते
संशयितांनी वरणगाव नगरपालिका तसेच जळगाव नगररचना विभाग यांचे बनावट लेटरहेड तसेच सही, शिक्का बनविले. त्याचा वापर करत फिर्यादीसह साक्षीदाराला विश्‍वास संपादन करण्यासाठी नोकरीवर रुजू करण्याचे आदेशपत्र देवून टाकले होते. अशा प्रकारचे शासकीय दस्ताऐवज खोटे बनवून ते खरे आहे, असे दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु होता.

या संशयितांना केली अटक
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द आढाव यांनी संशयितांच्या शोधासाठी सहाय्यक पोलीस निरिक्षक मंजितसिंग चव्हाण, शफीकखान पठाण, राजेंद्र पाटील, अधिकार पाटील, सुनील सोनार, नितीन सपकाळे, किशोर काळे या पथकाला सुचना केल्या होत्या. त्यानुसार पथकाने तपासचक्रे फिरवून दोन महिन्यांच्या आत निजानंद उर्फ आनंदा तुकाराम भंगाळे रा.आदर्शनगर जळगाव, गणेश जवरे रा. यशवंत नगर भडगाव, डॉ. सचिन शंकर चौधरी रा. रुईखेडा ता.मुक्ताईनगर यांना अटक केली. यातील चंद्रकांत गोवर्धन चिरमाडे रा. पार्वतीनगर जळगाव हा संशयित फरार आहे.