पंकजा मुंडे यांचा कालच्या वक्तव्यावरून ‘घुमजाव’

0

परळी-‘माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते’, असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल परळीत मराठा मोर्चेकरांच्या ठिय्या आंदोलनादरम्यान केले. मात्र मुंडे यांच्या या वक्तव्याला आता राजकीय वळण मिळाले आहे. म्हणूनच पंकजा मुंडे यांनी कालच्या त्या वक्तव्यावरून यू-टर्न घेत स्पष्टीकरण दिले आहे.

परळीमध्ये ठिय्या आंदोलनासाठी जमलेल्या मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांची समजूत काढण्याच्या उद्देशाने मी तसे वक्यव्य केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शक्य असते तर त्यांनीही आरक्षणाच्या फाइलवर लगेच सही केली असती अशी पुष्टीही केली.