Sunday , March 18 2018

पंजाब नॅशनल बँकेत 11,330 कोटींचा घोटाळा

शेअर 8 टक्क्यांनी घसरले, गुंतवणूकदारांना 3000 कोटींना चुना

मुंबई : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी व दुसर्‍या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)मध्ये तब्बल 1.77 अब्ज डॉलर्सचा म्हणजेच सुमारे 11 हजार 330 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे पुढे आले आहे. ही रक्कम मुंबईतील एका शाखेतून झालेल्या अनधिकृत व्यवहारांशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. अपहार झालेल्या रकमेपैकी निवडक रक्कम ही ज्या खात्यातून अपहार केला जायाचा त्या खातेदारास अदा केली जात होती, असेही दिसून आले असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन बँक प्रशासनाने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला (बीएसई) माहिती दिली आहे. या घोटाळ्याचा परिणाम इतर बँकांवरही पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, बँकेची अंतर्गत यंत्रणा या प्रकरणाचा तपास घेत होती. हा घोटाळा उघडकीस येताच, बँकेचा शेअर आठ टक्क्यांनी घसरले. ज्यात गुंतवणूकदारांचे तीन हजार कोटी रुपये बुडाले आहेत. बुधवारी शेअर बाजार सुरु होताच, बँकेचा शेअर 5.7 टक्क्यांनी घसरला होता.

एमएटीने केले होते अपिल
कर्जवितरणाच्या बाबतीत पंजाब नॅशनल बँक ही देशातली दुसर्‍या क्रमांकाची तर एकूण मालमत्तेच्या बाबतीत चौथ्या क्रमांकाची बँक आहे. या घोटाळ्याबाबत मुंबईतील बँकेचे अधिकारी म्हणाले, बँकेत अशाप्रकारे समोर येणारे व्यवहार हे गुंतागुंतीचे असतात, त्यामुळे या घटनेची योग्य ती चौकशी करुन मगच त्याबाबत कायदेशीर कारवाई करणे योग्य होईल. तसेच या व्यवहाराबाबतची संपूर्ण माहिती चौकशीनंतर समोर येईल, त्यामुळे त्यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही.

बँकेच्या शेअरचा भाव घसरला
पंजाब नॅशनल बँकेमध्ये काही अनियमित व्यवहार झाल्याने यापूर्वीही चौकशी झाली होती. यावेळी ज्वेलर्सचा व्यवसाय असणार्‍या देशातील श्रीमंतांपैकी निरव मोदी यांची चौकशी करण्यात आली होती. यावेळी 282 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे आताचा घोटाळा हा खूप जास्त रकमेच्या असल्याने बँकिंग क्षेत्रातील सर्वांसाठीच ही मोठी घटना असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप या घोटाळ्यात कोणाचेही नाव समोर आलेले नाही. या वृत्ताचा थेट परिणाम शेअर बाजारात दिसून आला. बँकेच्या शेअरचा भाव बुधवारी जवळपास पाच टक्क्यांनी घसरला.

हे देखील वाचा

पर्यटक बनून बनावट नोटा वटवणार्‍या बंगालच्या तरुणाला पकडले!

उरण । दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा वटविणार्‍या एका भामट्याला मोरा पोलिसांनी अटक केली. उरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *