पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचार्‍यांनी दिले 21 लाख

0

भुसावळ : देशात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने संपूर्ण देशात लॉक डाऊन केल्याने सर्व उद्योग धंदे बंद असून अर्थव्यवस्थेवर विपरीत परीणाम झाला आहे. सर्वच शासकीय यंत्रणा या स्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न करीत असून भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचार्‍यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी सुमारे 21 लाख रुपयांचा निधी देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

सामाजिक बांधीलकीचे भान
देशासह राज्याला मोठा फटका बसला असून सर्वत्र लॉक डाऊन असल्याने सर्वच उद्योगधंद्यावर आर्थिक मंदीचे सावट दिसत आहे. मजूर परीवार यामुळे घरातच बसून असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी आपणही काही देणे लागतो, अशी भावना भुसावळ ऑर्डनन्सच्या सर्व अधिकारी व कमृचार्‍यांनी ठेवत 21 लाख रुपये पी.एम.केअर्स फंडात दिले. ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे महाप्रबंधक राजीव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचार्‍यांनी संयुक्तपणे हा निधी दिला.